Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे समाधान शिबिराचे आयोजन 350 लाभार्थीचा सहभाग

भादा येथे समाधान शिबिराचे आयोजन 350 लाभार्थीचा सहभाग 

बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे सोमवार दि 27 जून 2022 रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी औसा तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या नियोजनाखाली आणि संगायो अध्यक्ष बबन भोसले यांच्या सहकार्याने औसा तालुक्यात प्रत्येक गावामध्ये शिबिर घेण्याचा निर्णय बैठकीत घेतलेने प्रत्यक्षात लाभधारकांच्या लाभासाठी आणि आर्थिक मदतीसाठी योग्य तऱ्हेने शासकीय स्तरावर हि योजना राबविले जावे याकरिता हे समाधान शिबीर घेण्यात आले होते.

यावेळी भादा येथील बहुतांश 350 च्या जवळपास लाभार्थी  नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला असून याकरिता प्रभारी मंडळाधिकारी सदानंद सोमवंशी, तलाठी राम दुधाभाते, ग्राम विकास अधिकारी एम व्ही सूर्यवंशी, भादा मि. सरपंच हणमंत दरेकर, उपसरपंच बी एम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, तानाजी गायकवाड,योगेश लटूरे,सूर्यकांत उबाळे, संगायो सदस्य राम पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष एस पी पाटील,उपाध्यक्ष पांडुरंग कात्रे, सामाजिक कार्यकर्ते खय्युम मुलानी,खलील सय्यद, सोमनाथ हजारे, रामेश्वर माळी, आदींनी मोठा सहभाग घेऊन समाधान शिबिर यशस्वी केले.

Post a Comment

0 Comments