Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

निलंगा: शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२२ मद्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेमद्ये महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेचे एकुण ३८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. शाळेच्या एकुण निकाल ९७.३८ %लागला असुन विषेश प्राविण्य २४४ प्रथम श्रेणी ९१ द्तीय श्रेणी ३३ उत्तीर्ण ०५ एकुण ३७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत गुण क्रमाने प्रथम शाळेतुन प्रथम कु.मुळजे श्रृष्टी दत्ता ९९.६०%व द्वीतीय सय्यद आकासा हारुण ९९.४०% तृतीय कु. हजारे आंजली राजेद्र ९८.००% व कु. घाडगे श्रद्धा सतिश ९८% तर मुलांमद्ये पहीला शाश्वत मल्लिकार्जुन कोळळे ९६.४०% घेत यश संपादन केले आहे. ९०% पेक्षा जास्त गुण घेणारे एकुण ५३ विद्यार्थी आहेत सर्व यशस्वी विद्यार्थी चे हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र शिक्षण समिती चे आध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर, महाराष्ट्र काॕग्रेस कमीटीचे सचिव आशोकराव पाटील निलंगेकर शाळेचे मु,अ. पांचगे, उप मु.अ. पवार पर्यवेक्षका श्रीमती देशमुख एस.डी.सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments