Latest News

6/recent/ticker-posts

भादा ग्रामपंचायतच्या प्रयत्नाने आठ दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा झाले पाणीच पाणी

भादा ग्रामपंचायतच्या प्रयत्नाने आठ दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा झाले पाणीच पाणी


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे गेल्या आठ दिवसापासून पाईपलाईन खराब झाल्याने नळांना पाणी येणे बंद झाले होते.


यामुळे उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाण्याचा किंचितही टंचाईचा सामना करावा लागला नाही परंतु आता पावसाळ्यामध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती परंतु संततधार पाऊस सुरू असल्याने हे पाईपलाईन दुरुस्ती करण्यास वेळ लागला आणि दुरुस्ती केल्यानंतरही लगेच इतर ठिकाणी पाईपलाईन खराब झाल्याने नागरिकांना आठ दिवसांसाठी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले परंतु बाजार उपसरपंच बालाजी शिंदे आणि ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी आणि पाणीपुरवठा कर्मचारी बनसोडे, स्वामी, फरताळे आदींनी पावसामध्येही प्रयत्न सुरू ठेवून गावाला पाणीपुरवठा योजना सुरळीत केल्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे भागामध्ये पाणीपुरवठा झाल्याने गावातील नागरिकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments