औसा तालुक्यातील पाऊस परस्थिती: रात्रभर पडलं पण रानं नाही भिजलं
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील पाऊस परस्थिती मोठी विचित्र झाली आहे कारण रात्रभर पडलं पण रानंच नाही भिजलं अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
मागील तीन दिवसापासून औसा तालुक्यात दिवसा आणि रात्री पण पावसाला सुरुवात होते ती अशी की एकदम शांत आणि बारीक तुषारची फवारणी करावी तसा हा पाऊस पडतोय यामुळे पेरलेल्या पिकांना आवश्यक असा पाऊस आणि पाणी पुरवठा न झाल्याने पिकांची वाढ थांबलेली आहे आणि त्या पिकांचे वय वाढत आहे. यामुळे उत्पादनावर मोठा दुष्परिणाम होणार हे शेतकऱ्यांना निश्चित दिसून येत आहे.
यावर्षी मे महिन्यामध्येच पावसाला जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होऊन पेरणी होईल असा हवामान खात्याचा अंदाज होता तो साफ खोटा ठरल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. यावर्षी खरीप हंगाम मधील खरीप पीक निहाय पेरणी क्षेत्राचा अहवाल व सर्वसाधारण क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र हेक्टर क टक्केवारी कार्यालय तालुका कृषी अधिकारी औसा जिल्हा लातूर यांचा अहवाल पुढील प्रमाणे आहे खरीप ज्वारी 140 हे.मका-82.1 एकूण तृणधान्ये 222.1,तूर 820 मग 167.6 उडीद 133.4 एकूण कडधान्य पेरा 1 हजार 121 हेक्टर, सोयाबीन 10 हजार 34.53 हेक्टर, एकूण औसा तालुका क्षेत्र हे 1लाख 10 हजार 632.82 हेक्टर खरीप हंगामातील पेरणी योग्य क्षेत्रापैकी आज रोजी 11 हजार 377.63 हेक्टर क्षेत्र सध्या पीक पेरणी करण्यात आल्याचे सध्या कृषी विभागाकडून अधिकृत माहिती बेलकुंड मंडळ कृषी अधिकारी व्ही डी लुटुरे यांनी दिली.



0 Comments