Latest News

6/recent/ticker-posts

लातूरच्या गंजगोलाईतील चापसी सायकल स्टोअर्स व तुलसी मोबाईल दुकानाला भीषण आग,आगीचे कारण अस्पष्ट

लातूरच्या गंजगोलाईतील चापसी सायकल स्टोअर्स व तुलसी मोबाईल दुकानाला भीषण आग,आगीचे कारण अस्पष्ट

लातूर: शहरातील गंजगोलाई लगत प्रसिद्ध असलेले चापसी सायकल विक्रीचे दुकान व तुलसी मोबाईलच्या दुकानाला आज 24 जुलै रोजी रात्री 8:00 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या मध्ये चापसी सायकल दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या प्रयत्न करत होत्या. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आणली.


ही आग नेमकी कशामुळे लागली किंवा कोणी लावली, याचे कारण समजू शकले नाही. मात्र ही आग लागल्यानंतर गंजगोलाई भागात एकच हलकल्लोळ झाला. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात होते.



Post a Comment

0 Comments