औसा तालुक्यात पावसाचा जोर वाढला खरीप हंगामाचा उतार मात्र घटला!
बी डी उबाळे
औसा: शंनिवार दि 23 जुलै 2022 रोजी पहाटेपासूनच दिवसभर रिमझिम पण संततधार पाऊस सुरूच होता.
यामुळे दिवसभर नागरिकांना घराच्या बाहेरही पडता आले नाही आणि शेती कामांमध्ये तर मोठा ब्रेक लागल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु सूर्यास्तापूर्वी सहाच्या दरम्यान औसा तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याचे चित्र दिसून आले.
यामुळे शेती पिकांना आणि सुरू असलेल्या पिकांतील मशागतीना या पावसाने पिकामध्ये पाणीच पाणी झाल्याने तर ब्रेक लागला असून पिकांची अवस्था अत्यंत खराब होत असल्याचे आणि कोवळ्या पिकांना जास्त प्रमाणात पाणी होत असल्याने पिके पिवळी पडत आहेत तर मोठे पिकांना अंतर्गत मशागतीची अत्यंत आवश्यकता असून टॉनिक, औषध फवारणी कोळपणी आदि मशागतीची कामे करणे जरुरी आहे.
परंतु हे कामे करण्यासाठी पावसाने सतत हजेरी लावल्याने ही शेती कामे करता येत नाहीत त्यामुळे या खरीप पिकातून होणारे उत्पन्न नक्कीच घडणार आहे?असे चित्र औसा तालुक्यात दिसून येत आहे.



0 Comments