Latest News

6/recent/ticker-posts

लोकमंगल तर्फे स्वच्छता कर्मचारी,अंगणवाडी सेविकाचा सत्कार

लोकमंगल तर्फे स्वच्छता कर्मचारी,अंगणवाडी सेविकाचा सत्कार

बी डी उबाळे

औसा: लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर तसेच लोकमंगल उद्योग समूहाच्या वतीने समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची नेहमीच दखल घेतली जाते मागील दोन वर्षापासून कोरोना सारख्या भयानक संकट काळामध्ये अंगणवाडी कार्यकर्त्या आणि नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांनी स्वतःच्या कुटुंबाची व जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेला आपले कुटुंबीय समजून त्यांची सेवा केली म्हणून लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या औसा शाखेच्या वतीने औसा नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी व अंगणवाडी कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी जनसंपर्क अधिकारी राहुल चव्हाण शाखा व्यवस्थापक शैलेश चिंचनसुरे रोखपाल बसवराज घोडके आणि सपना गवळी तसेच स्थानिक सल्लागार दत्तात्रेय माळी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments