शिरोळ येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
शिरोळ वां.( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण येथे ) साहित्यरत्न,लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात पार पडली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोळचे सरपंच गौतम सुरवसे हे होते. यावेळी निमंत्रितांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे सदस्यांनी केले अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी आपण सर्वांनी बांधिल असले पाहिजे असेही यावेळी चर्चिले गेले सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सामाजिक शांतता सलोखा राखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आजच्या कार्यक्रमातुन दिसले.
कार्यक्रमाला आलेल्या आलेले आमंत्रित पाहुण्यांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अनंत कांबळे,दामाजी कांबळे,बालाजी कांबळे,शुभम कांबळे, झटिंग जाधव सिद्धेश्वर कांबळे,विद्यासागर कांबळे,सौदागर पुंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर कांबळे यांनी केले.



0 Comments