मोतीनगर येथे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृतीपर रॅली व तिरंगा ध्वजाचे विनाशुल्क वाटप
लातूर: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भारत भर विविध उपक्रम राबविले जात असून जनसामान्य लोकांपर्यंत जागृती केली जात आहे. याच अनुषंगाने शुक्रवार दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी लातूर येथील मोतीनगर भागात तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते. हर घर तिरंगा जागृती रॅली अंतर्गत; येथील रघुनाथ कलंत्री प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी, मुख्याध्यापिका डी एम तोष्णीवाल, व्ही पी गव्हाणे, व्ही बी धोत्रे, एल डी कराड आदी महिला शिक्षकाने यांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदविला. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांच्या देशाभिमानात्मक घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी प्रत्येक घरी गृहभेटी देऊन घरावरती तिरंगा ध्वज लावण्याबद्दल जनजागृती केली तसेच परिसरातील नागरिकांना मोफत तिरंगा ध्वजाचे वितरन करण्यात आले. यावेळी राहुल भुतडा, सुनील राठी, संतोष सारडा, दत्ता भुसणुरे, जाधव गणेश, विनोद पारिख, सिद्धेश्वर भडके, रमण काबरा, बाबुशा पवार, नरेश कुलकर्णी, उमेश पवार, सचिन कपनूरे, विलास चौधरी, राहुल पाटील, रामलिंग स्वामी, अमोल कुलकर्णी, इत्यादी उपस्थित होते.


0 Comments