भादा येथील मुख्य चौकात लतीफशावली गुलाब शावली दर्गाहवर डोलतोय तिरंगा
बी डी उबाळे
औसा- तालुक्यातील भादा येथील जागृत देवस्थान असणारे ग्रामपंचायत समोरील हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान लतीफशावली गुलाबशावली दर्गाह यावर भारताचा तिरंगा सामाजिक कार्यकर्ते खय्युम मुलांनी आणि अमिन पठाण यांच्या पुढाकाराने हा तिरंगा लावण्यात आला असून हा तिरंगा भादा गावामध्ये सर्वात उंच ठिकाणी असल्याची चर्चा आहे.
सध्या भादा मध्ये ग्रामपंचायतच्या नियोजनाने हर घर तिरंगा ही संकल्पना केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या शासकीय परिपत्रकानुसार आगदि व्यवस्थितपणे गावांमध्ये राबविली जात आहे.
या योजनेअंतर्गत जे नागरिक आपल्या घरावर तिरंगा लावण्याची इच्छा बाळगतात त्यांना ग्रामपंचायत भादा कडून सशुल्क किंवा निशुल्क या दोन्ही पद्धतीने ग्रामपंचायत भादा येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
या कामी उपसरपंच बालाजी शिंदे, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी आणि ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी हे तिरंगा वाटपासाठी सदैव तत्पर असल्याचे माहिती मिळत असून, तिरंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाईल याचेच नियोजन ग्रामपंचायत कडून असल्याचे समजते.


0 Comments