औशात काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन
बी डी उबाळे
औसा: येथील दिवंगत कै.हणमंत सदाशिव कसबे यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजीत भव्य रक्तदान शिबीराचा शुभारंभ शुक्रवारी लातूर जिल्हा कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कॉग्रेस पक्षचे जयराज कसबे व माजी नगर सेविका अॅड मंजुषा कसबे, यांचा पुढाकारातुन मागील १७ वर्षे पासुन सतत हे सामाजिक उपक्रम (रक्तदान शिबीर) आयोजीत करन्यात येत आहे. त्या बद्दल जिल्हा कॉग्रेस पक्षाच्या वतीने श्रीशैल उटगे यांचा हस्ते शाल,पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी कॉग्रेस प्रदेश सचिव अमर खानापुरे, ओबीसी कॉग्रेस मराठवाडा अध्यक्ष प्रा. सुधिर पोतदार, शहर कॉग्रेस अध्यक्ष शकील शेख, माजी नगर सेवक अंगद कांबळे, युवक कॉग्रेस प्रदेश सचिव अॅड दिपक राठोड, खुंनमिर मुल्ला शहराध्यक्ष विलासराव देशमुख युवा मंच औसा,राजेंद्र बनसोडे अनुसुचित जाती कॉग्रेस सेल, भागवत म्हञे ओबीसी कॉग्रेस शहर प्रमुख, हाजी शेख अल्पसंख्यक कॉग्रेस कार्याध्यक्ष औसा शहर, मुज्जमिल शेख,अॅड शाहनवाज पटेल, नियामत लोहारे, अॅड फय्याज पटेल,गणेश कसबे, बाबा पटेल, व आदी मान्यवर उपस्थीत होते.

0 Comments