Latest News

6/recent/ticker-posts

बैलपोळा निमित्त अंगणवाडीच्या बालकांची वेशभूषा ठरली आकर्षक

बैलपोळा निमित्त अंगणवाडीच्या बालकांची वेशभूषा ठरली आकर्षक


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील अंगणवाडी मध्ये लहान बालकांना भारत देशात विविधतेतून एकता दाखविण्यासाठी ही वेशभूषा परिधान करण्यात आली होती.

 या वेशभूषेमध्ये आपले राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रपुरुष यांची वेशभूषा करण्यात आली होती या वेशभूषेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता रमाई, राष्ट्रमाता जिजाऊ, रण-रागीनी अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहूजी महाराज, बसवेश्वर महाराज यांची वेशभूषा करून लहान लहान मुले अगदी आनंद मध्ये अंगणवाडी शाळेमध्ये उपस्थित झाले होते.

 यामुळे या भागाचे आकर्षण हे इवले इवले बालक या भागातील सुंदर आकर्षण ठरल्याने त्यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments