Latest News

6/recent/ticker-posts

अंबुलगा(मेन) येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम

अंबुलगा(मेन) येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम 


निलंगा: श्री वेंकटेश चारीटेबल ट्रस्ट, निलंगा यांच्यावतीने मौजे अंबुलगा(मेन) ता. निलंगा येथे आज 7 सप्टेंबर रोजी वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास निलंगा वनविभागाचे अधिकारी भडगणे हे उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमास सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार परमेश्वर शिंदे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.  ट्रस्टचे अध्यक्ष Adv. तिरुपती शिंदे सर्व पदाधिकारी अंबुलगा(मेन) चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ह भ प नेताजी महाराज शिंदे, मेघराज तोंडवळे, विकास पाटील, पंकज शिंदे, संजय खराडे, चंद्रकांत शिंदे, प्रवीण शिंदे, बालाजी पाटील, अनुरथ माने, गयबी शेख, हरिभाऊ शिंदे, सदाशिव शिंदे, जालिंदर सुरवसे, दिलीप शिंदे, भानुदास शिंदे नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रत्येकांनी आपल्या शेताच्या बांधावर, सोयीनुसार वृक्षाची लागवड करावी व त्याची जोपासना करावी असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष च्या वतीने करण्यात आले व नागरिकांना चिंच, करंज, साग, सिताफळ, आवळा अशा ५०० वृक्षचे वाटप करण्यात आले. सदर ट्रस्टचा वृक्ष वाटपाचा हा चौथा वर्ष होता.

Post a Comment

0 Comments