परिवहन आयुक्त कार्यालयाची इरादा पत्र सेवा आता ऑनलाईन,खाजगी प्रवासी बस वाहतूक व्यावसायिकांची सोय
सतीश तांदळे
मुंबई: खाजगी प्रवासी बस वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला ऑल इंडिया पर्यटन वाहन परवाना (एसी-नॉन एसी), महाराष्ट्र एसी स्लीपर्स परवाना आता ऑनलाईन उपलब्ध होणार असून यासाठी होणारी मुंबई वारी आता टळणार आहे. खाजगी प्रवासी बस वाहतूक करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना यापूर्वी मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन हा परवाना मिळविण्यासाठी अर्ज करावा लागायचा. जवळपास 2 ते 3 दिवसानंतर हा परवाना प्राप्त व्हायचा. मात्र आता ही पायपीट थांबली असून परिवहन आयुक्त कार्यालयाने ही सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. परवान्यासाठी मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयात जाण्याची गरज नसून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आयुक्त कार्यालय याला मंजुरी देईल. मंजूर झालेल्या परवान्याची प्रत आता घरबसल्या प्रिंट करून उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र परिवहन उपआयुक्त(संगणक) संदेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ऑनलाईन इरादा पत्र परवाना सेवेमुळे राज्यातील हजारो खाजगी प्रवासी बस वाहतूक व्यावसायिकांची गैरसोय दूर होणार आहे.

0 Comments