लातूर जिल्ह्यातील भादा ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याचे काम सुरु असताना कामगारांनी हातातले काम बाजुला ठेवून सामुहिक राष्ट्रगीत गायले
औसा: तालुक्यातील भादा येथील आनंदनगर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीचे काम सुरू असून या कामावर असलेल्या सर्व कामगारांनी आज सकाळी 11:00 वाजता हातातले काम बाजुला ठेवून सामुहिक राष्ट्रगीत गायले.
याबाबत बाबत औसा पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत बारबोले यांनी मजुरांना या अगोदरच सामूहिक राष्ट्रगीत बाबत मार्गदर्शन केले होते.
यावेळी ग्रामरोजगार सेवक बालाजी उबाळे आणि उपसरपंच बालाजी शिंदे सह मजूर उपस्थित होते.

0 Comments