औसा पालिकेने सुरू केलेल्या खुल्या जागेवरील कंपाऊंड वाॅलच्या कामाने भूमाफियांचे धाबे दणाणले
शेख बी.जी.
औसा: दि. 21 - शहरात विविध विकास कामे पालिकेकडून चालू आहेत. यात हदवाढ क्षेत्रात "ओपन स्पेस"वर कंपाऊंड वॉल च्या कामाला सुरुवात झाली आहे.
तब्बल 35 वर्षानंतर शहराची हद्द वाढ मागील सत्ताधार्यांनी करून घेतली. हद्दवाढ होण्याआधी आपापल्या जमिनीचा लेआउट तयार करून प्लॉट विक्री केली. प्लॉट विक्री करत असताना नगररचनाकारांनी ठरवून दिलेल्या "खुल्या जागा" देखील गायब असल्याचे समजते.परंतु शहराच्या हद्दवाढीनंतर पालिकेने ज्या ज्या ठिकाणी खुल्या जागा आहेत अशा ठिकाणी वेगवेगळी कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे शहरात "ओपन स्पेस" वर कंपाऊंड वॉल चे बांधकाम सुरू केले आहे.हे पहिले काम असल्याने भुमाफीयांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.पालिकेने सुरू केलेल्या बरकत नगर येथील कामाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे. मुलांसाठी खेळण्यासाठी जागा सोडल्या जातात. अशा अनेक ठिकाणच्या जागा मूळ मालकांच्या लेआऊट नुसार नसल्याची चर्चा शहरात आहे.
येणाऱ्या काळात नगररचनाकारच्या लेआउट नुसार खुल्या जागेवर कामे केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या प्रभागाचे माजी नगरसेवक शेख जावेद यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की "भविष्यात बरकत नगरला शहरातील आदर्श नगर म्हणून नावारूपास अनावयाचे आहे.
या ठिकाणी काम करत असताना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे"
सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी "हदवाढीच्या क्षेत्रात नगररचनाकाराने दिलेल्या लेआउट नुसार कामे करणार आहोत" हा दिलेला शब्द पाळला जात आहे असे बोलले जात आहे.
0 Comments