विविध मागण्या संदर्भात रिपाई चे देवणी तहसीलदारांना निवेदन
देवणी:(प्रतीनीधी/विक्रम गायकवाड) दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) तालुका देवणी च्या वतीने विविध मागण्या संदर्भात देवणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सदरील निवेदनात मौजे दवनहिप्परगा ते वलांडी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असणाऱ्या रस्त्यावरील फुलाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येऊन त्याचा परवाना रद्द करण्यात यावी व त्यास मदत करणाऱ्या भ्रष्ट अभियंतास तात्काळ निलंबित करण्यात यावे, देवणी तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत मिळणाऱ्या घरकुलांच्या अनुदान 1 लाख 20 हजारावरून 2 लाख 50 हजार पर्यंत वाढविण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांनाही शासकीय अनुदान देण्यात यावे. अशा विविध मागण्या संदर्भात देवणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी देवणी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवनहीपरगेकर, तालुका सचिव पुष्पक सूर्यवंशी, संपर्कप्रमुख दीपक कांबळे, युवा अध्यक्ष भीम दर्शन बोरे, मातंग आघाडी अध्यक्ष गंगाधर जिरे, शहराध्यक्ष विक्रम गायकवाड, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विठ्ठल गायकवाड आदी रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments