वाशी नवी मुंबई येथे फॅशन शो व भव्य खुल्या नृत्य स्पर्धा
नवी मुंबई: ट्रेडिशनल डान्स असोसिएशन इंडिया आयोजित फॅशन शो व भव्य खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी मराठी साहित्य सांस्कृतिक कला केंद्र, सेक्टर 6, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित केले असल्याची माहिती मुख्य आयोजक मनोज बरडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्राची लोकधारा म्हणून लावणी ओळखली जाते. ही लोककला रुजावी व वाढावी यासाठी ही लावणी नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. लावणीसह पारंपारिक नृत्य, लोकनृत्य, भरतनाट्यम, बॉलीवूड, वेस्टर्न, फोक डान्स, हिप-हॉप, गरबा दांडिया हे सर्व प्रकार या स्पर्धेत घेतले जाणार आहेत. या स्पर्धा एकल नृत्य, जोडीनृत्य, तिहेरी नृत्य व सामूहिक नृत्य मध्ये घेतले जाणार आहेत.
स्पर्धेतील गट पुढील प्रमाणे राहणार आहेत. 9 वर्ष वयोगट(लहान गट), 10 ते 16 वर्ष, 17 ते 25 वर्षे, 25 च्या पुढे खुलागट अशा प्रकार गटांत स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना भरघोस रकमेसह पारितोषिके देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन मनोजकुमार बरडे, दीप्ती पवार, रजनी गुप्ता यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या 9930301777, 9372675410, 9619312711, 9082556233 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.



0 Comments