शहरातील मुख्य बस स्थानकाजवळील ऑटो पॉईंटच्या शेजारी फुटपाथावर सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
लातूर: शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य बस स्थानकाच्या जवळ ऑटो पॉईंटच्या शेजारी फूटपथावर आज बुधवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या अंगात निळसर रंगाचा फुल भायाचा टी-शर्ट व काळसर रंगाची जीन्स पॅन्ट तसेच छातीवर उजव्या बाजूस आई असे नाव गोंदलेले आहे सदर इसमाची व त्यांच्या नातेवाईकांची ओळख पठल्यास गांधी चौक पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन गांधी चौक पोलिसांनी आज केले आहे.

0 Comments