Latest News

6/recent/ticker-posts

तालुक्यातील सोयाबीन वरील पिवळा मोझॅक आणि फुल गळती मुळे शेतकरी चिंताग्रस्त

तालुक्यातील सोयाबीन वरील पिवळा मोझॅक आणि फुल गळती मुळे शेतकरी चिंताग्रस्त


तालुका वार्तापत्र

बी डी उबाळे

औसा: औसा तालुक्यातील खरीप पिक सोयाबीन यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून फुल गळती आणि पिवळा मोझक यामुळे तालुक्यातील शेतकरी आणि भादा परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र औसा तालुक्यातील भादा शिवारातील जालिंदर रत्ने यांच्या शेतातील हा प्लॉटचे छायाचित्र दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठा चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.


नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या औसा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुळावर सातत्याने नैसर्गिक संकटाची मालिका अखंडितपणे सुरू आहे. कोवळी पिके असताना रिमझिम व सततधार पावसामुळे पिके पिवळी पडली होती. त्यानंतर तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकत- वाळत असताना मागील दोन-तीन दिवसांपूर्वी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. परंतु सध्या सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव,फुलाची गळती आणि पिवळा मोझॅक नावाचा रोग पडल्यामुळे सोयाबीनची पिके धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. 


मागील वर्षी बऱ्यापैकी उत्पादन झालेले असताना यावर्षी मात्र शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे संकटाचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक पडल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या शेंगा चपट्या होत असून पिके पिवळी पडून सुकत असल्याने उत्पादन कमालीचे घटणार आहे. सोयाबीन हे शेतकऱ्याचे प्रमुख नगदी पीक असताना नगदी पिकाने यावर्षी धोका दिल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.


औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी खरीप पिकाची आर्थिक साथ म्हणावी तशी मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. गोगलगायी, हरीण, मोर अशा वन्य प्राण्याचा उपद्रव पिकांना झाल्यामुळे ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या खरीप पिकाचे नुकसान झाले असून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा करून ही अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आशा लागली आहे. तसेच कोट्यावधी रुपयाचा खरीपपासाठी पिक विमा भरूनही पिक विमा मिळण्याबाबत सरकारची उदासीनतेची भूमिका दिसून येत आहे.

कृषी विभागाचा सल्ला

बहुतांश भागामध्ये विशेषतः 25 जून ते 10 जुलै दरम्यान सोयाबीन KDS-726 या वाणाची पेरणी झालेल्या क्षेत्रात फुलोऱ्या ते चट्टे अवस्थेत (पीक सर्वसाधारण 45 ते 55 दिवसाचे) पावसाची मोठी उघडीप होती, त्या दरम्यान घाटे अळीचा (Heliothis armigera) मोठ्या प्रमाणात प्राधुर्भाव होऊन घेला आहे. त्यामुळे अस्या क्षेत्रातील फुले ते चट्टे मोठ्याप्रमाणात अळी द्वारे खाल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः अळीचा पानावर कमी प्राधुर्भाव असल्यामुळे बरेच शेतकरी अनभिज्ञ् आहेत. उशिरा पेरणी झालेलेल्या KDS -726 क्षेत्रात फुलोरा अस्वस्थेत असून मोठ्या प्रमाणात जण जागृती आवशक्य आहे. मागील कांही वर्ष्याच्या रेफरन्सेस नुसार अस्या क्षेत्रात 25 ते 30 % पर्यंत पुनर्र फुल धारणा झाल्याचे अनुभव आहेत.

त्या मुळे मोठ्या अवस्थेतील घाटे अळी, लष्करी अळी व उंट अळीच्या त्वरित नियंत्रणासाठी  एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक व एक पुनर्रफुल धारणेसाठी अमिनो ऍसिड युक्त संप्रेरकाची फवारणी घ्यावी.

- विकास धो लटूरे,कृषी पर्यवेक्षक, बेलकुडं- भादा ता औसा.

Post a Comment

0 Comments