उटी(बू) येथे पोषण माह निमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट;मार्गदर्शन करून पुढील नियोजनासाठी दिल्या सूचना
बी डी उबाळे
औसा: औसा तालुक्यातील उटी (बू) येथे दि 7 सप्टेंबर 2022 रोजी प्रकल्प औसा विभाग अलमला आणि उटी(बू) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी भेट देवून पोषण माह अंतर्गत पोषण रॅली / अन्नप्राशन उपक्रमात सहभाग नोंदविला. पुढील उपक्रमासाठी मार्गदर्शनपर सुचना दिल्या व सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी औसा किशोर गोरे, प्रगत शिक्षण संस्थेचे मिलींद अहिवाळ, विस्तार अधिकारी व औसा पंचायत समिती सर्व विभाग प्रमुख सर्व पर्यवेक्षिका सेविका मदतनिस गाव चे सरपंच भालचंद्र पाटील आणि उपसरपंच ग्रामस्थ पुरुष, महिला गरोदर माता स्तनदा माता किशोरी मुली लाभार्थी व यांची उपस्थिती होती.


0 Comments