Latest News

6/recent/ticker-posts

आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे शिक्षक दिन साजरा

आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे शिक्षक दिन साजरा


देवणी:(प्रतीनीधी/विक्रम गायकवाड) आबासाहेब इंग्लिश स्कूल, देवणी येथे शिक्षक दिन आणि डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून देवणी येथील कै.रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.चंद्रकांतजी जावळे आणि कै.रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. शिवाजीराव सोनटक्के मा.न.दत्त विद्यालय देवणीचे सेवानिवृत्त शिक्षक रमेश मंनसूरे तसेच देवणी शहरातील नावाजलेल्या कोचिंग क्लासेसचे इम्तियाज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आजच्या परिस्थितीत उपयोगी पडणारे विचार या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी मांडले. तसेच काही विद्यार्थ्यांनी पण त्यांची मते मांडली, त्यात भाग्यज्योती गुड्डा आणि श्वेता बिरादार या विद्यार्थिनींनी शिक्षकांबद्दल आपले विचार व्यक्त केले. 


त्याचबरोबर जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे अध्यक्ष गोविंदरावजी भोपनिकर आणि संस्थेचे सचिव गजाननजी भोपणीकर यांच्याकडून आबासाहेब इंग्लिश स्कूल च्या संपूर्ण शिक्षक व शिक्षिकांचे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गणेशोत्सवा निम्मित विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे मनोबल वाढण्यास मदत व्हावी म्हणून त्यांना विविध प्रकारचे बक्षिसे देऊन हा कार्यक्रम घेण्यात आला. स्कूलच्या प्राचार्या सुप्रिया अनिल कांबळे यांच्या नियोजनात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात उमेश आंबेनगरे ,रणजीत गायकवाड, विक्रम गायकवाड, इमरान पठाण, भीमराव महाके, मोहसीन शेख ,विश्वनाथ बिरादार, प्रियंका मंटोळे , इफरोज शेख, नेहा सय्यद ,प्रतीक्षा सूर्यवंशी, रेखा आडे, सबा शेख यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments