Latest News

6/recent/ticker-posts

कै.रसिका महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

कै.रसिका महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

देवणी:( प्रतिनिधी/विक्रम गायकवाड ) येथील कै. रसिका महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त "वाचन : काल आज आणि उद्या" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी केले.

कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथील माजी प्राचार्य डॉ. नामदेव खंडगावे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मणराव दारनुळे, आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सुप्रिया कांबळे यांची उपस्थिती होती.  प्रमुख व्याख्याते डॉ. नामदेव खांडगावे व लक्ष्मण यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी खानापुरे वीरेंद्र, श्रद्धा बिरादार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल नागमुळे श्रीनिवास, सगर अभिषेक, बोद्रे आनंद, पठाण इम्रान, प्रा. डॉ. रेणुका कुणाळे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांनी केले. आभार प्रदर्शन कु. शिवलीला संते यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments