महाराष्ट्र महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकात्मतेची शपथ
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात भारताचे लोहपुरूष, देशाचे पहिले उप पंतप्रधान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व देशाच्या तिसऱ्या व पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील खेडा, बार्डोली येथील शेतकरी अंदोलने व इतर महत्वाच्या चळवळींमध्ये सरदार पटेल यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याशिवाय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील लहानमोठी ५५० पेक्षा अधिक संस्थाने आपल्या कुशल नेतृत्वाने भारतात विलीन करून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेत महत्वाचे योगदान सरदार पटेल यांनी दिले होते. त्याबद्दल याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
याचवेळी भारताच्या तिसऱ्या व पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, अंगद जाधव, नामदेव गाडीवान, विजय देशमुख, उमाजी तोरकड, गणेश वाकळे, गोपाळ भोपी, भागवत पवार, इस्माईल शिंदे, यांची उपस्थिती होती.



0 Comments