Latest News

6/recent/ticker-posts

खाजगी वाहनांच्या आडमुठी धोरणामुळे होतो सतत चक्का जाम

खाजगी वाहनांच्या आडमुठी धोरणामुळे होतो सतत चक्का जाम

औसा: दि.22 शहरातील हाश्मी चौक येथे खाजगी वाहने वेडीवाकडी पार्क केल्यामुळे या ठिकाणी सतत चक्काजाम होत असल्याचे दिसून येत आहे. यापुर्वी या ठिकाणी होणाऱ्या चक्काजामच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी प्रसिद्ध केल्यामुळे येथील चौकात असलेले सर्व पथविक्रेत्यांना व दुकानदारांना नोटीसा देऊन ते मागे घेण्याचा आदेश दिला होता.

त्यामुळे येथील चौकाने मोकळा श्वास घेतला होता. पण खाजगी वाहनामुळे परत या चौकात चक्काजाम होत असल्याचे  निदर्शनास येत आहे. यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त देऊन देखील येथील खाजगी वाहनधारक नियम धाब्यावर बसवून वाहने आडवी लावून प्रवासी वाहतूक करत असल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे पथविक्रेत्यांना व दुकानदारांना नोटिसा दिल्या त्याप्रमाणे खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालक यांना तशाच प्रकारची नोटीस देऊन आपली वाहने व्यवस्थित करावी अशा प्रकारच्या सूचना देणे आवश्यक आहे. जे वाहन चालक नियमाचे पालन करणार नाही अशा वाहनांची जप्ती करण्याची सक्ती करणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेला साफसफाई करून वाहतुकीसाठी व्यवस्थित करणे आवश्यक आहे.रस्त्याच्या कडेला दगड माती व चिखल झाल्याने दाटीवाटीने वाहने चालतात ही वरदळ कमी करण्यासाठी मोकळ्या झालेल्या जागेवर साफसफाई करणे आवश्यक आहे.

पोलीस प्रशासनाने पूर्वीप्रमाणे ॲक्शन मोड मध्ये येऊन कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे येथील नागरीकांचे म्हणणे आहे. अन्यथा हा चक्काजाम सतत होत राहील.

Post a Comment

0 Comments