दारूच्या नशेत झिंगाट होऊन दहशत निर्माण करणाऱ्या 3 तरुणांना धारदार शस्त्रासह भादा पोलिसांकडून अटक
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा पोलीस ठाणे हद्दीतील टाका येथे पहाटेच्या सुमारास तीन तरुण दारूच्या नसेत धारदार शस्त्र बाळगून दिं 16 नोव्हेंबर रोजी रात्री 21:15 वाजता दहशत निर्माण करीत असल्याचे भादा पोलिसांना निदर्शनास आले वरून त्यांना अटक करण्यात आली.
गु.र.न.- 182/2022 कलम 4,25 भारतीय शस्त्र अधिनियम, कलम 85 (1)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये. फिर्यादी - अविनाश श्रीपती टोपे पोहे का 715 नेमणूक पोलीस स्टेशन भादा.
आरोपी- अक्षय शिवराज होळकुंदे, करण सुरेश हजारे, प्रकाश शहाजी सगर, कडे एक धारदार कोयता, एक होंडा कंपनीची एक्टिवा पांढऱ्या रंगाची एम एच 24 बीबी 50 74 असा एकूण मुद्देमाल 50 हजार 100 रू चा मिळाला यातील नमूद आरोपींनी दारूच्या नशेत मौजे टाका गावात आरडाओरडा करून दहशत निर्माण करून विना पास परवाना स्कुटीच्या डिक्कीत लोखंडी धारदार कोयता बाळगलेले मिळून आले व जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून फिर्याद पो काँ अविनाश टोपे यांनी दिलेवरून गुन्हा दाखल केला आहे. त्यांचेकडून शस्त्र व गुन्ह्यात वापरलेले वाहन स्कूटी जप्त केले आहे. सदर तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालय औसा येथे हजर करण्यात आले.
सद्या ग्राम पंचायत निवडणुका तोंडावर आल्या असून त्या अनुषंगाने पो स्टे भादा कडून हद्दीत विशेष लक्ष असणार असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगलेले मिळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर सदरील प्रकरणी कामगीरी सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नवले, स पो उ नि प्रकाश शिंदे, राजेंद्र देशमुख, टोपे, कमाल शेख, सूर्यकांत गिरी, महेश चव्हान, केशव चौघुले यांनी केली.



0 Comments