शिवणी कोतल मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवर महिलांनी घातला बहिष्कार;अवैध दारू बंद झाली तरच मतदान करू
प्रशासनाने अवैध दारू बंद करून लेखी आश्वासन दयावे. या मागणीवरच महिला ठाम
शिवणी कोतल: (प्रतिनिधी/महेश शेळके) एकीकडे निवडणुकीचे वारे वाहत असताना मात्र शिवणी(को) येथील महिलांनी प्रशासनाने अवैध दारू विक्री बंद करावी व लेखी आश्वासन दयावे अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशाराच दिला आहे.
निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल मध्ये अवैध दारू विक्री खुलेआम कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे. आजपर्यंत बरेच निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. एक वेळा ग्रामपंचायत मार्फत अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमास पकडून पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले होते. त्यानंतर परत दारू विक्री होत असल्याने दिसून येत आहे मद्यपी मध्यपान करून त्याच ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करतात या मुळे भाडणे होण्याचे हि प्रकार अधिक वाढलेले आहेत. विशेष विदयार्थी, शाळकरी मुली व महिलांना याचा नाहक त्रास होत आहे. शिवीगाळ भांडणाचे प्रमाण वाढले असुन आमच्या सोबत वाईट काही घडले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.
जो पर्यंत अवैध दारू बंद होत नाही. तसेच या विषयी भविष्यात दारू विक्री होणार नाही या विषयी प्रशासन लेखी आश्वासन देणार नाही. तो पर्यंत निवडणुकीवर आमचा बहिष्कार असेल आधी दारू बंदी मगच निवडणूका होतील असे ठाम मत कोतल शिवणी येथील महिलांनी माडले आहे.



0 Comments