Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहात

चाकूर तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहात


नळेगाव: येथील कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालय येथे चाकूर तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा- 2022 घेण्यात आल्या स्पर्धेच्या सुरुवातीला कराटे प्रशिक्षक कै. सुरेश विठोबा फरकांडे यांना श्रद्धांजली वाहून स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी स्पर्धकांनी आपल्या आपल्या वयोगटात व वजन गटांमध्ये आपली चमक दाखवत यश संपादन केले. यावेळी अनंत तुळजाराम नाईक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक रामदास बिराजदार, सरस्वती माध्यमिक विद्यालय जानवळचे क्रीडाशिक्षक मुळे अशीहरा कराटे असोसिएशनचे सचिव संतोष तेलंगे, देवणीचे कराटे प्रशिक्षक विक्रम गायकवाड, गणेश माचवे, पत्रकार के.वाय.पटवेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कै. नरसिंगराव चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक चेतन चव्हाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments