लातूरच्या रेल्वे स्थानकावर मुलाचा वडीलासमोरच रेल्वेत मृत्यू, पोलिसाच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार
के वाय पटवेकर
लातुर: कुर्डूवाडी येथून रेल्वेत बसलेले बाप लेक लातूरच्या रेल्वे स्थानकात येत असलेल्या 35 वर्षीय मुलाचा लातूरच्या रेल्वे स्थानकात रेल्वेतच मृत्यू झाला खिशात दमडी नसताना हतबल वडिलांना प्रवाशांनी व नागरिकांनी रेल्वे स्थानकावर धीर देत पोलिसाच्या मदतीने लातूरतील सामाजिक काम करणाऱ्या कार्य कर्त्यांच्या मदतीने शहरात अनोळखी असलेल्या या मुलावर लातूरात अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले. असल्याचे आज रेल्वे पोलीसानी सांगितले,
सदरील ही घटना घटना गुरुवारी दिनांक 3 सायंकाळी लातूर रेल्वे स्थानकात घडली होती,
कुर्डूवाडी येथील रहिवासी असलेले महादेव नरहरी जैन वय 63 वर्ष व त्यांचा मुलगा प्रदीप महादेव जैन वय 35 वर्ष मुंबई-लातूर रेल्वेने लातूरच्या दिशेने आले होते प्रदीप हा मागील काही वर्षापासून आजाराने ग्रस्त होता दरम्यान रेल्वे स्थानकात पोहोचताच रेल्वेतच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी वृद्ध महादेव जैन यांच्या जवळ पैसे नव्हते आणि अन्य कोणते नातेवाईकही लातुरत त्यांच्याकडे येण्यासारखी परिस्थिती नव्हती तरुण मुलाचा मृतदेह सोबत घेऊन ते रेल्वे स्थानकात बसलेली माहिती रेल्वे पोलीस व एमआयडीसी पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला,
त्यानंतर महादेव जैन यांची परिस्थिती लक्षात घेत त्यांनी सदर घटनेची माहिती शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना व संघटनेला दिले तेव्हा शहरातील सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व काही तरुणांनी या वृत्त पावलेल्या तरुणावर अंत्यसंस्कार केले आहेत अशी माहिती आज रेल्वे पोलिसांनी दिली आहे.




0 Comments