Latest News

6/recent/ticker-posts

आदम नगर विकास कामांसाठी महापालिकेत ठिय्या आंदोलन

आदम नगर विकास कामांसाठी महापालिकेत ठिय्या आंदोलन

लातूर: आदम नगर आणि हिमायत नगर वस्तीतील विकास कामांबाबत महापालिकेत हिमायत नगर आदाम नगर कृती समिती तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले गेल्या १७ वारसांपासून या वस्तीला नाली, रोड लाईट, आरोग्य आदी सुविधा मिळत नसल्याने संपूर्ण महिना भर आंदोलनाचा बडगा स्थानिक नागरिकांनी उगारला आहे मागील दिवसात करो या मरो हि भूमिका घेऊन सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान, माजी नगरसेवक रघुनाथ बनसोडे, प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. महापालीकेत वरील मागण्यांबाबत ठिय्या आंदोलन करण्यात आले, महापालिका आयुक्त यांनी लिखित स्वरूपात १८ तारखेच्या आत संबंधित प्रभागाचे काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

लातूरला शांघाय बनवणाऱ्यांना आदाम नगर - हिमायत नगर का दिसत नाही महापालिकेच्या नावावर , विकासाच्या नावावर पुरस्कार घेऊन मिरवणारे आता कुठे गेले असा सवाल ही मोहसीन खान यांनी केला आहे. जो पर्यंत या प्रभागाचे काम होणार नाहीत तो पर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचे मोहसीन खान यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments