Latest News

6/recent/ticker-posts

आदर्श जिवन निर्माण युवका/युवतीचे प्रशिक्षण शिबीराचा समारोप

आदर्श जिवन निर्माण युवका/युवतीचे प्रशिक्षण शिबीराचा समारोप

लातूर: वीर यौद्धा संघटनेने लातूर शहरातील सिध्येश्वर व रत्नेश्वर मंदिर येथे 100 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थ्यासाठी एक महिण्याचे आदर्श जिवन निर्माण शिबीराचे आयोजन केले होते या शिबीरात 100 युवक युवतीनी सहभाग घेतला होता. व्यसनमुक्ती, आत्मरक्षा, स्त्री सन्मान, व सामाजिक बांधिलकी, यासोबत लाठी काठी प्रशिक्षण हि देण्यात आले  प्रशिक्षक सुरज व्यवहारे ,सागर गोरे  प्रशिक्षकानी रोक हात,मार हाथ, लाठी मार हात आगे पिछे,रोक हात आगे पिछे,लाठी आगे चाल,पिछे चाल,रणमार बांई और से,दाहिने हाथसे ,रणमार चाल आगे पिछेमार, रणमार छलांग,रणमार चारो दिशाऔंमे ,लाठी स्पायरिंग,लाठी हल्ला मार रोक ई प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती शिबीराचे आयोजक संयोजक तथा महाराष्ट्र वीर यौद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजणकर यानी दिली आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज लाठी काठी प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ‌सदरील समारोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य वीर दलाचे अधिष्ठाता व्यंकटेश हालींगे हे होते.

तर मंचावर शिबीर संयोजक तथा महाराष्ट्र वीर यौद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजणकर, प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शिवशाहीर संतोष साळुंखे व सागर कणकधर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारोप समारंभा प्रसंगी उपस्थित शिबीरार्थ्याना शिवशाहीर संतोष साळुंखे, सागर कणकधर वीर यौद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजणकर, राष्ट्र, देश, धर्म रक्षणार्थ उच्च कोटीची चरीत्रवाण पीढी निर्माण करण्यास आवश्यक राष्ट्र भक्ती ने ओतप्रोत असे भावनीक मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबीरात सहभागी होऊन प्रशिक्षण प्राप्त केलेल्या यशस्वी शिबीरार्थ्याना शिवशाहीर संतोष जी साळुंखे, श्रीकांत रांजणकर, सागर कणकधर व कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटेश हालिंगे च्या हस्ते भारत मातेची प्रतीमा व प्राविण्य प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुरज व्यवहारे यानी केले तर संभाजी कांबळे यानी आभार प्रदर्शन केले. शिबिराचे यशस्वीतेसाठी हिरामण आचार्य, प्रकाश बारबोले, परीश्रम घेतले सहभागी व यशस्वी शिबीरार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments