अमृत महोत्सवी वर्ष निमित्त भादा येथे कायदेविषयक विधी साक्षरता शिबीर संपन्न
बी डी उबाळे
औसा: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विधी सेवा साक्षरता शिबीर दिं 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 रोजी औसा तालुक्यातील भादा येथे मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी ठीक 6:00 वा ग्राम पंचायत कार्यालय, भादा बाजूस असलेल्या हरिहर मंदिर येथे, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर औसा यांचे कायदेविषयक विधी साक्षरता शिबीर ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेविषयक ज्ञान आत्मसात व्हावे यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार जन्सेवेची माहिती देण्यात आली आहे.
सदर शिबिरामध्ये औसा न्यायाधीश एस एल फुले सर,तालुका वकील मंडळाचे अध्यक्ष ऍड महाजन,सचिव- अँड सचिन पाटील,अँड मोरे,अँड सगट,अँड सुरवसे भादा येथील अँड शिवलकर यांनी कायदेविषयक माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर धावती भेट पोलीस ठाणे भादा येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नवले यांनी ठाण्यास भेट देण्याची विनंती केल्याने न्यायाधीश फुले सर आणि अँड टीमने भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भादा पोलीस ठाणे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नवले, बीट अमलदार डोलारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर सरपंच मिनाबाई दरेकर,उपसरपंच बालाजी शिंदे, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी सदरील कार्यक्रमाचे व्यवस्थितपणे नियोजन केले होते प्रास्ताविक प्रा दत्तात्रय सुरवसे तर आभार ग्राम विकास अधिकारी मानिक सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी रविशंकर आर पाटील,लिपीक कांबळे,विधी स्वयसेवक श्रीमंत गवळी,शिवाजी उबाळे आणि ग्रामस्थ,महीला उपस्थित होते.


0 Comments