भीम जयंती निमित्त तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती स्थापना
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील हारेगाव येथे भिमजयंतीनिमीत्त तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा पुजनीय भंतेजी धम्मसारजी किल्लारी यांच्या मंगल हस्ते शुक्रवार दिं 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठिक.11:30 वाजता ढोलताशाच्या गजरात पुष्पवृष्ठी करत "सबका मंगल हो"च्या जयघोषात थाटात प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बुद्धरुप आणि डॉ बाबासाहेबांच्या मुर्ती दानदाते आयु.लक्ष्मीताई मेजर निवृत्ती माने यांचा गावकरी यांनी शाॅल,फेटा,पुष्पहार देवुन सत्कार केला.
प्रमुख पाहुणे म्हणुन विलास घारगावकर, कवि दिलीप गायकवाडांचा सन्मान केला. यावेळी विलास घारगावकर, कवि दिलीप गायकवाड यानी बुद्धभिमाचे नि बुद्ध विहारानेच आपल्याला सन्मान, वैभव,सुसंस्कार,व प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. शीलसदाचाराचे पालन करत चलावे सब मंगल होईल असा आशावाद केला. पुज्य.भंते धम्मसारनी मंगलकारी धम्मदेसना दिली. संचलन बिभिषन मानेंनी केले. शोभा मानेंनी धम्मपालन गाथेनी सांगता केली. लक्ष्मीबाईंनी खीर दान केले. यावेळी मोठ्या संखेनी ग्रामस्थ उपस्थित होते.


0 Comments