लातूरच्या चार martial art प्रशिक्षकांना इंटरनॅशनल कराटे मधील विविध ब्लॅक बेल्ट Dan परीक्षेत यश
लातूर : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे येथे ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप- 2024 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला देशभरातून बऱ्याच राज्यातून खेळाडूने सहभाग नोंदवला. विशेष सेयचेललेस व साउथ आफ्रिका या देशाच्या एका टीमनेही आपली हजेरी लावली होती. मूळचे भारतीय वंशाचे साऊथ आफ्रिकेचे हुसेन नारकर { वर्ल्ड हेडमास्टर- अशिहारा कराटे इंटरनॅशनल } यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने व स्वतः कांचो- हुसेन नारकर यांनी एकदिवशीय प्रशिक्षण दिले. यावेळी विविध ब्लॅक बेल्ट Dan परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ब्लॅक बेल्ट 5 th Dan- खय्युम तांबोळी, ब्लॅक बेल्ट 4 th Dan- के वाय पटवेकर, 3 rd Dan- युसुफ शेख, विक्रम गायकवाड यांनी यश संपादन केले. यशस्वी लातूरच्या कराटे प्रशिक्षकांना सी. ए. तांबोळी (अध्यक्ष- अशिहरा कराटे इंडिया) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कराटेच्या विविध ब्लॅक बेल्ट Dan परीक्षेचे प्रमाणपत्र तथा बेल्ट वितरण समारंभामध्ये इतर मान्यवरांच्या हस्ते व कांचो- हुसेन नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
ययशस्वी प्रशिक्षकांचे "माझं लातूर" WhatsApp समूहाचे प्रमुख सतीश तांदळे, PATM फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज मणियार, शादाबभाई पटवेकर, काशिनाथ आप्पा बळवंते, संजय स्वामी, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे, पत्रकार- लिंबराज अण्णा पन्हाळकर, कराटे प्रशिक्षक संतोष तेलंगे, क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तळेगाव, अहमदपूर संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू मद्देवाड, प्राचार्य जेबाबेरला नादार, पत्रकार अमरदीप बोरे, तानाजी येनकुरे, चाकूर काँग्रेस तालुका अध्यक्ष- विलास पाटील, पप्पू शेख, सलीम तांबोळी, अण्णासाहेब पाटील, सिराज जहागीरदार, कलीमुद्दीन अहमद, रियाज पठाण, छोटू पटेल, सुनील शिंदे, सौ. कुशावर्ता ताई बेळे, सौ. मनाली शिंदे ,रमेश मन्सुरे, नागेश जीवने आदिने यशस्वी प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.


0 Comments