बेलापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भारतीय संविधान वर व्याख्यान
नवी मुंबई: बेलापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी भारतीय संविधानावरील एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात भारतीय संविधानाच्या महत्वावर सखोल चर्चा करण्यात आली. संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेपासून ते त्यातील अधिकार, कर्तव्ये आणि मूलभूत तत्वांवर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते- मनोज भीमसेन राजपक्षे(विधी सल्लागार) यांनी संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आणि आधुनिक काळातील त्याच्या लागूकरणाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि त्यातील समतावादी आणि लोकतांत्रिक मूल्ये समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. व्याख्यानाचा उद्देश भारतीय नागरिक म्हणून संविधानाशी असलेली बांधिलकी आणि जबाबदाऱ्या याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. मंचावरती संस्थेचे प्राचार्य सदाशिव पाटील, गट निदेशक सिरसाट, मनोज राजपक्षे, पत्रकार के वाय पटवेकर, पोलीस कर्मचारी नितीन शिंदे हे होते.
या वेळी देशमुख, राठोड, खामकर, महाडिक, घोगले, जाधव, कोळी, पाटील मॅडम, भालेराव मॅडम, राजपूत मॅडम घोगले संस्थेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम संविधान उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले त्यानंतर दहा मिनिटांचा ध्यान योग यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे गट निदेशक सिरसाट यांनी मानले.


0 Comments