Latest News

6/recent/ticker-posts

UWSKF केम्पो खेळाचा शालेय क्रीडा प्रकारात सन 2024-25 या वर्षासाठी राज्यस्तरापर्यंत समावेश करण्याकरिता क्रीडा मंत्री यांना निवेदन

UWSKF केम्पो खेळाचा शालेय क्रीडा प्रकारात सन 2024-25 या वर्षासाठी राज्यस्तरापर्यंत समावेश करण्याकरिता क्रीडा मंत्री यांना निवेदन

मुस्तफा सय्यद

 पुणे: दि. 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना UWSKF केम्पो खेळाचा शालेय क्रीडा प्रकारात सन 2024-25 या वर्षासाठी राज्यस्तरापर्यंत समावेश करण्याकरिता क्रीडा मंत्री यांना शासकीय विश्रामगृह उदगीर येथे निवेदन देण्यात आले. केम्पो हा एक प्रभावी आत्मरक्षा क्रीडा प्रकार आहे, जो शारीरिक आणि मानसिक विकासास प्रोत्साहन देतो. केम्पो खेळाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होईल, आत्मविश्वास व संघभावना निर्माण होईल. UWSKF केम्पो शालेय क्रीडाप्रकारात समाविष्ट झाल्यास, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संधी मिळतील आणि हे राज्यस्तरावर आपल्या राज्याचे, देशाचे नाव मोठे करतील.


 केम्पो मध्ये विविध प्रकारच्या नियमांनुसार लढतींचे आयोजन होते. हा खेळ आधुनिक आणि सतत विकसित होणारा मार्शल आर्ट क्रीडा प्रकार आहे. या खेळाचा समावेश शालेय खेळामध्ये करण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात आले होते सदर निवेदन क्रीडामंत्र्यांच्या आदेशित केल्याप्रमाणे आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी आयुक्त राजेश देशमुख तथा उपसंचालक संजय सबनीस क्रिडा व युवक सेवा संचानालय श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे यांना पत्र देण्यात आले. यावेळी स्पोर्ट केम्पो महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष अलीमभाई तांबोळी, सचिव के वाय पटवेकर, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सी ए तांबोळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव मह्मणे आदी उपस्थित होते.

 

 

Post a Comment

0 Comments