Latest News

6/recent/ticker-posts

'जागर शिवशाही ते होळकरशाही' उपक्रमांतर्गत राष्ट्रीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा भव्य समारोप चांदवड येथे

'जागर शिवशाही ते होळकरशाही' उपक्रमांतर्गत राष्ट्रीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा भव्य समारोप चांदवड येथे


चांदवड : { वर्षा चौरे }‘जागर शिवशाही ते होळकरशाही’ या उपक्रमांतर्गत ‘भारतीय इतिहास प्रबोधिनी, मुंबई’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ चा भव्य पारितोषिक वितरण समारंभ चांदवड येथील ऐतिहासिक होळकरवाडा (रंगमहाल) येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. देवीदास पोटे यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्यांमध्ये श्रीमंत राजे नानासाहेब होळकर, श्रीमंत मुकुंदराजे होळकर, डॉ. रमिला गायकवाड (मुंबई), प्राचार्य अन्वर शेख (बीड), डॉ. रमेश पिसे (नागपूर), डॉ. प्रेरणा राऊत (पालघर), डॉ. तुषार चिंचोले (नाशिक), प्राचार्य दत्तात्रय बारगळ, राजीव हाके (धुळे), सुभाष पवार (सहाय्यक व्यवस्थापक), प्रा. डॉ. सुरेश पाटील, समाधान बागल, डॉ. वर्षा चौरे तसेच प्रा. सुभाष वाल्हेकर (त्र्यंबकेश्वर) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमंत राजे नानासाहेब होळकर व श्रीमंत मुकुंदराजे होळकर यांच्या शुभहस्ते नगरपरिषद येथील शिवप्रतिमेचे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजगादीचे पूजन व महाआरती करण्यात आली. स्पर्धेत निवड झालेल्या अनुश्री चौधरी (जळगाव), रणरागिणी शिंपले (धाराशिव), कनिष्का म्हात्रे (कल्याण), शुभम खरात, प्रा. अरुणा वाघोले (आळेफाटा), प्रा. स्नेहा महांबरे (गोवा), कुंदा कुलकर्णी (मालेगाव) आणि रमा शिंदे (पुणे) या स्पर्धकांनी ‘होळकरशाही’ तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे सादर करून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन संजय पाडवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वर्षा चौरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments