क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळेगाव येथील कराटे खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा
अहमदपूर : तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये अशिहारा कराटे असोसिएशन, लातूरच्या वतीने कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत स्वराज माने, राजवीर अलापुरे, स्नेहल डोईफोडे, खुशी मुकनर, माधवी, विश्वजीत पाटील, आझाद शेख, संध्याताई गाडेकर, जयराज महालिंगे, रियांश कोरे, शाश्वत कोरे, बुंद्राळे रुद्र, रोशन परिहार, कासनाळे क्रांती, कासनाळे ऋषिकेश, प्रसाद पताळे, अन्वी देशमुख, सादिया पठाण, ज्ञानेश्वरी शिंदे, अपर्णा भांगे, रेणुका नखाते, प्रणव गायकवाड, जैद शेख, सलाउद्दीन पठाण, सुलतान पठाण, अनुज भांगे, तेजस वाडकर, निदा शेख यांच्यासह एकूण 70 कराटे प्रशिक्षणार्थींनी यश संपादन केले.
उत्तीर्ण कराटेपटूंना अशिहारा कराटे इंडियाचे अधिकृत प्रमाणपत्र व बेल्ट प्रदान करण्यात आले. मुख्य परीक्षक म्हणून के. वाय. पटवेकर यांनी भूमिका पार पाडली, तर क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मार्शल आर्ट कोच विक्रम गायकवाड व चाकूर तथा चापोली येथील सेल्फ डिफेन्स मल्टीपर्पज अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक युसुफ शेख यांनी सहपरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू मद्देवाड, शाळेच्या प्राचार्या जेबा बेरला नादार, संगमेश्वर ढगे, इस्माईल शेख तसेच पालक - अलका गायकवाड, वैशाली नखाते, सरोजा शिंदे, अहमद शेख यांच्यासह मित्रपरिवाराने अभिनंदन केले.


0 Comments