Latest News

6/recent/ticker-posts

जय भारत कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी सागर तेलंगे ‘GPAT’ परीक्षेत उत्तीर्ण; महाविद्यालयात सत्कार

जय भारत कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी सागर तेलंगे ‘GPAT’ परीक्षेत उत्तीर्ण; महाविद्यालयात सत्कार


लातूर : निलंगा तालुक्यातील दापका येथील जय भारत कॉलेज ऑफ फार्मसी चा बी. फार्म अंतिम वर्षाचा विद्यार्थी कु. सागर गोविंद तेलंगे याने फार्मसी क्षेत्रातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील GPAT (Graduate Pharmacy Aptitude Test) परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत सागरने उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. GPAT ही परीक्षा देशभरातील फार्मसी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत स्पर्धात्मक मानली जाते आणि त्यात यश मिळवणे ही मोठी कामगिरी समजली जाते. या यशाबद्दल बोलताना सागर तेलंगे म्हणाला की, “महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित अभ्यास आणि जिद्द यांच्या जोरावर हे यश मिळवता आले.” पुढील काळात फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन संशोधन क्षेत्रात कार्य करण्याचा त्याचा मानस आहे.

दरम्यान, या यशानिमित्त जय भारत कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सागर तेलंगे याचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थापक, व्यवस्थापन मंडळ व प्राचार्य यांच्या हस्ते त्याला पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही अभिमानास्पद बाब आहे,” अशा शब्दांत व्यवस्थापनाने त्याचे कौतुक केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सागरचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Post a Comment

0 Comments