भीमा कोरेगाव प्रकरणी शासनाने खुलासा करावा- प्रकाश आंबेडकर
दिल्ली: (प्रतिनिधी) भीमा कोरेगाव प्रकरणी राज्य सरकारने काही गुन्हे मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे, त्यांनी कोणते गुन्हे मागे घेतले आहे याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे, ते नवी दिल्ली येथे बोलत होते,भीमा कोरेगाव या ठिकाणी ज्या शूरवीरांनी आपले बलिदान दिले, त्यांना वंदन करण्यासाठी 1 जानेवारीला गेलेल्या लोकांवर सामूहिक हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्या प्रकरणी काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर या हल्ल्याचा निषेध म्हणून 2 आणि 3 जानेवारीला आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलकांवर पोलिसांनी अनेक केसेस दाखल केल्या आहेत, त्यामुळे राज्य सरकारने आता काही केसेस मागे घेतल्या आहेत, त्या कुठल्या केसेस आहेत 2 जानेवारीच्या की नंतर झालेल्या निषेध आंदोलनाच्या याचा खुलासा राज्य सरकारने करावा. अशी विनंती प्रकाश आंबेडकरानी केली आहे.
0 Comments