मुंबईतील मलबार हिलजवळच्या लास्ट पाम इमारतीला भीषण आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत या इमारतीतून आत्तापर्यंत तिघांना सोडवण्यात आलं आहे. मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहितीही समोर आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या आगीतून आत्तापर्यंत आठ जणांची सुटका करण्यात आली आहे.
ही इमारत ९ मजल्यांची आहे. पाचव्या मजल्यावर आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने फ्लॅट नंबर ५२ ला आग लागली. या इमारतीत २७ फ्लॅट आहेत अशीही माहिती समोर आली आहे. आता या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत आधी तीन जणांना या इमारतीतून वाचवण्यात आलं होतं. आता एकूण आठ जणांची सुटका कऱण्यात आली आहे.
0 Comments