Latest News

6/recent/ticker-posts

पुढील निवडणुकीत बॅलेट पेपरची मागणी- प्रकाश आंबेडकर


 मुंबई: दिल्लीत झालेल्या विधानसभे च्या निवडणूकीत भाजपचा पार धुव्वा उडाला असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ल आप पक्षाने एकहाती विजय रथ खेचून आणला आहे, दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आमचीच सत्ता येणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र दुपार पर्यंत कल हाती येऊ लागल्यावर भाजपा गोटात शांतता पसरू लागली, एक हाती सत्ता घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे मी अभिनंदन करतो, त्यांनी भाजपला हरवले, या पुढील निवडणुकांसाठी बॅलेट पेपरचा वापर करावा, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे,
      दिल्लीत आपचा विजय झाला, त्यांनी भाजपला हरवून नवीन वातावरण निर्माण केले हे मी मानत नाही, मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये पराभव पत्करावा लागला, मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाला, त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपा विरोधी सरकार आहे त्या सर्वानी निर्णय घेतला पाहिजे की स्थानिक स्वराज्य निवडणुकीत EVM चा वापर करणार नाही,  बॅलेट पेपरचा आग्रह करण्यात येईल, जेणे करून निवडणूक आयोगावर दबाव निर्माण होईल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.


Post a Comment

0 Comments