ब्रुस-ली आणि चित्रपट सृष्टी
कुंग-फु-कराटे या कलात्मक क्रीडा प्रकाराने व त्यावर आधारलेल्या चित्रपटांनी जगातील अबालवृद्धांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ब्रूस-लीचा जन्म २७ नोव्हेंबर १९४० ला सॅनफ्रान्झिस्को येथे झाला.वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी रहस्यमयरीत्या मृत्यू पावलेल्या कुंग- फु -कराटे सम्राट ब्रुस लीचे ऍक्शनपट आजही अबोल वृद्धांकडून आवडीने पाहिले जातात.ब्रुस लीचे वडील एका ओपेरामध्ये विदूषकाच्या रुपात कार्यरत होते.ब्रुस लीचे पालन-पोषण हॉंगकॉंग येथे झाले.त्याच्या कुटूूबियांचा रंगमंच्याशी पहिल्यापासून संबंध होता.ब्रुस ली ६ वर्षाचा होता.तेंव्हा त्याने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.
हॉंगकॉंग चित्रपट सृष्टीत ब्रुस लीने वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत वीस चित्रपटात भूमिका वाटवल्या.अवघ्या वयाच्या अठराव्या वर्षी त्याला अमेरिकेचे नागरित्व मिळाले.
'बर्थ ऑफ अ मॅन' हा ब्रुस लीचा पहिला चित्रपट.सेंट झेवियर शाळेचा विध्यार्थी असणाऱ्या ब्रुस 'लीने विंग चान' या संस्थेत कराटेचे धडे घेतले.त्याचा त्याला फायदा आणि तोटाही झाला.चित्रपटाद्वारे नाव झाल्यामुळे हाँगकाँगच्या गलीत ब्रुस लीने तवाळखोरी सुरू केली.वडिलांनी वैतागून त्याला अमरिकेला पाठवले.वशिंग्टन विधापीठात ब्रुस लीने तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला.लिडा एमरी या मेडिकलच्या विध्यार्थीनीशी त्याचे प्रेम संबंध जुळले.वयाच्या तेविसव्या वर्षी त्याचा लिंडाशी विवाह झाला.नंतर हे जोडपे ऑकलंडला गेले.गुरू यिफ मॅन यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण कलेच्या अनेक पध्दतीवर ब्रुस लीने प्रभुत्व मिळवले होते.कॅलिफोेर्णीयातील लॉंग बीचवर त्यांचे प्रदर्शन करून त्याने सर्वाना थक्क करून सोडले. 'बॅटमन'चे टीव्ही निर्माते विलियम डोझिये यांच्याकडे केशभूषाकार असण्याऱ्या जे सेब्रिग या महिलेने ब्रुस लिची शिफारस डोझिये यांच्याकडे केली.त्यामुळे एबीसी टी.व्ही.च्या 'दि ग्रीन हार्णेट' या मालिकेत काटोची भूमिका (१९६६) ब्रुस-लीला मिळाली. कॅमेऱ्याला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य पूर्वीपासून असल्यामुळे ब्रुस लीने काटोची भूमिका चांगलीच रंगविली.त्यामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.लॉंग स्ट्रीक, लॉन्द्री आयन साईड्रस आदी टी. व्ही.चित्रपट ब्रुस-लीकडे चालून आले त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
१९६८ मद्ये रेमंड चंडलरच्या 'मारलोव'या चित्रपटातील छोट्या भूमिकेने आणि 'कुंग-फू' या दूरचित्रवाणी मालिकेने ब्रूस-लीचे नाव सर्वतोमुखी झाले.हाँगकाँग टी. व्ही. वरील १९६९ ब्रूसलीची प्रात्यक्षिकेही लोकप्रिय झाली.१९६९ ते १९७३ या काळात ब्रूस लीचे चार चित्रपट झळकले 'दि बिंग बॉस'(१९७१)हा चित्रपट अमेरिकेत 'फिस्ट्रस ऑफ फ्युरी'नावाने प्रदर्शित झाला.गोल्डन हार्वेस्ट कंपनीचा मालक रेमंड चाऊ याने हा चित्रपट ब्रूस लीला समोर ठेवून केला होता. बजेट होते पाच लाख डॉलर खाद्य पदार्थांची मारामार असलेल्यावर आधारित चितपट बँकाक जवळील खेड्यात चित्रिकरण करण्यात आले होते.दिग्दर्शक लो वेई यांच्याबरोबर ब्रुस लीचा झालेला वाद यामुळे 'बिंग बॉस' या विषयी शंका होत्या बॉब बेकर या अभिनेत्याबरोबर ब्रुस लीने कोणाच्याही लक्षात येणार नाही,अशा ठिकाणी बसून प्रीमियर शो पहिला.प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून ब्रुस लीने स्वत:लाच चिमटे घेतले.एकोणीस दिवसांत 'बिंग बॉस' चे उत्पन्न ३२ लाख डॉलर झाले.अमेरेका (३३ लाख) सिंगापूर,लंडन (१३ हजार पौंड)मलेशिया,फिलिपिन्स येथे 'बिंग बॉस' ने अनेक उच्चांक केले.बर्फाच्या कारखान्यात चेंग (ब्रस-ली) हा खेडवळ तरुण कामाला लागतो.कारखादर बर्फाच्या लाध्यातून अमली पदार्थांची तस्करी करीत असतो.ब्रुस-ली त्याचा नायनाट करतो,ही 'बिंग बॉस' ची सोपी कथा; परंतु ब्रुस लीची अविश्वसनीय ऍक्शन आणि उत्कृष्ट अभिनय यांनी 'बिंग बॉस' अजरामर झाला.ब्रुस-लीच्या ऍक्शन काहींना ट्रिकसीन वाटले.प्रेक्षकांनी ब्रुस लीवर अभिनंदनाचा वर्षाव केला.दिग्दर्शक लो वेई आणि अभिनेत्री नोरा मियाओ यांच्यासोबत ब्रुस लीचा (कथा ब्रूस-लीची)'दी चायनीज कनेक्शन'या चित्रपटानेही जगात अनेक विक्रम केले.ही कथा चेन (ब्रुस-ली)या करतेपटू विध्यार्थीच्या भोवती फिरते.जपानी लोकांनी चीनच्या केलेल्या अपमानाचा तसेच गुरूच्या हत्येचा बदला या चित्रपटात चेन घेतो.हाँगकाँगमध्ये चित्रपटाने चार आठवड्यात ४५ लाख डॉलरचे विक्रमी उत्पन्न मिळवले.सिंगापूरमध्ये प्रीमीअर शोच्या वेळी वाहतुकच बंद पडली.एका पौंडाचे तिकीट त्या वेळी पंधरा पौंडाना विकले गेले.आशियातील ऑस्कर समजला जाणारा 'गोल्डन हॉर्स' पुरस्कार तौवानने ब्रुस-लीला प्रदान केला.ब्रुस-ली 'सुपरमॅन'झाला.अमेरिकेचा जगप्रसिद्ध कराटे विजेता चॅक ब्रुस-लीच्या पुढच्या चित्रपटात भूमिकेसाठी तयार झाला.पत्र,बक्षिसे, प्रसिद्धि, पुरस्कार यांचा पाऊस 'दी चायनीज कनेक्शनने'ब्रुस लीवर पडला.
यानंतर आला 'दि वे ऑफ ड्रॅगन' हा चित्रपट भारतासह सर्वत्र 'रिटर्न ऑफ दि ड्रॅगन'नावाने आजही लोकप्रिय आहे.प्रचंड नफा आणि लोकप्रियता याची खात्री असल्याने या ड्रॅगनची कथा ब्रुस लीनेच लिहिली.लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय ब्रुस-लीचा असल्याने एक वेगळाच संस्मरणीय चित्रपट तयार झाला.अभिनेत्री होती नोरा नियाओ खानावळ चालवीणाऱ्या नोराला गुंड टोळी सतत त्रास देत असते.ही टोळी नेस्तनाबूत करून ट्रँग (ब्रुस-ली) नोराचे मन जिंकतो.ब्रुसचा सर्वनाश करण्यासाठी ही टोळी अमेरिकेच्या चॅक नॅारीस या करटेपटूला सुपारी देते.रोम शहराच्या एका गढीत ब्रुस-ली व चॅक नॅारीसची श्वास रोखून धरायला लावणारी फाईट होते.ती फाईट पुन्हा-पुन्हा पाहवेसे वाटते 'रिटर्न ऑफ ड्रॅगन'चे अभूतपूर्व यश ब्रुस-ली बरोबर चॅक नॅारीसचे नावही जगात बहुतेकांना परिचित आहे.शिवाय,पहिल्या तीन आठवड्यात या चित्रपटाने ५४ लाख डॉलरची कमाई केली होती.कुत्री आणि चिनी लोकांना प्रवेश बंद अशी पाटी अमेरिकेत हॉटेलमध्ये लावली जात असे ब्रुस-ली ती पायदळी तुडवतो तेव्हा चिनी प्रेक्षक तर चित्रपटगृहात एकच गोंधळ घालत होते.
ब्रुस-लीचा शेवटचा चित्रपट होता. 'एन्टर दि ड्रॅगन' ब्रुसच्या आधीच्या चित्रपटांचे विक्रम त्याने मोडले.जेम्स बॉन्डच्या चित्रपटासाठी त्या वेळी दहा लाख डॉलर खर्च होत असे'एन्टर दि ड्रॅगन' ला सहा लाख डॉलर खर्च आला.जगातील नामवंत करतेपटू अँजेला माओ यिंग(जपान)जॉन सक्शन (हॉलिवूड) जिम केले,बॉंब वॅल (अमेरिका)यांच्या भूमिका आणि दोनशे विख्यात कराटेपटूंबरोबर ब्रुस-लीची तुफान हाणामारी यामुळे 'एन्टर दि ड्रॅगन'ने हाँगकाँग, अमेरिका, ब्रिटन,कॅनडा,भारतासह सर्व जगात लोकप्रियता व विक्रमाची अनेक शिखरे सर केली.ब्रुस-ली हा गुप्तहेर हॉंगकॉंग जवळील एका बेटाचा सत्ताधीश हान याचा नि:पात करतो.ही चित्रपटाची कथा हान आणि लीची आरसे महालात झालेली व रोमांच उभी करणारी लढत कराटेच्या विलक्षण लढती आजही ताजा व प्रेक्षणीय वाटतात.अमेरिकेत पहिल्या सात आठवड्यात 'एन्टर दि ड्रॅगन' ने 30लाख डॉलर कमावले लंडनमध्ये पहिल्या महिनाभर तर तिकिटांचा काळा बाजारच सुरू होता.युरोप,अमेरिका, आशिया खंडात या चित्रपटाने खोऱ्याने पैसा ओढला.हॉंगकॉंगमध्ये ४० लाख डॉलरचे उत्पन्न सहज मिळाले.
'द चायनीज कनेक्शन', 'द विम बोस', 'फिस्ट ऑफ फ्युरी', 'लॉग स्ट्रीट', 'द वे ऑफ ड्रॅगन' आदी ब्रुस-लीचे बहुचर्चित चित्रपट होय ब्रुस-लीने 'गेम ऑफ डेथ' हा चित्रपट सुरू केला.मात्र ते प्रदर्शित होण्यापूर्वीच म्हणजे २० जुलै १९७३ ला त्याचा मृत्यू झाला.मृत्यूसमयी त्याचे वय अवघे ३२ वर्षे होते.
ब्रुस-लीचे नाव सतत शौर्य कलेच्या सम्राटाच्या स्वरूपामध्ये घेतले जाईल.
- के.वाय.पटवेकर
भ्रमणध्वनी क्रमांक:९२७०८८८५८७
0 Comments