एक हात मदतीचा ...चला पुढे येऊ सामाजिक बांधिलकी जपुया
लातूर:(प्रतिनिधी) दी.२९.३.२०२० रोजी प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी नगर परिसरात गरजुवंतांना सामाजिक बांधीललकी नाताने परिसरात किराणा मालाचे वाटप करण्यात आले.सध्या कोरोनाने थैमान माजलेला आहे यात लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यात रोज मोलमजुरी करून आपले संसार चालवतात त्यांची या काळात अडचण निर्माण झाली आहे.त्यांना संकटाच्या काळात सहकार्यच्या भावनेने कोणीही उपाशी नसावे आपणच आपल्या बांधवांचे सरंक्षण करणे ही काळाची गरज आहे. प्रभुराज प्रतिष्ठाण टीम यांनी गरजुवंताना घरगुती किराणा मालाची व्यवस्था केली होती टीमसोबत महानगर पालिका कर्मचारी व प्रतिनिधी या कार्यात सहभागी झाले होते. यावेळी प्रतिष्ठाण चे अँड.अजय कलशेट्टी,अमोल चामे, लोकप्रतिनिधी आयुब मणियार,जेष्ठ नागरिक लक्ष्मण लोहारे,साईनाथ रासे,वसुली लिपिक अशोक पवार,लक्षीमान ठाकूर,आदी उपस्थित होते.
0 Comments