Latest News

6/recent/ticker-posts

महत्वाची बातमी--> कोरोनाची थट्टा महागात पडणार; एप्रिल फुल केल्यास थेट जेलची हवा

कोरोनाची थट्टा महागात पडणार; एप्रिल फुल केल्यास थेट जेलची हवा


पुणे: (राजकुमार भंडारी) १ एप्रिल २०२० रोजी एप्रिल फूल होऊ नका रस्त्यावर येऊ नका असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव भोर विभाग, सासवड पुणे ग्रामीण विभाग यांनी नागरिकांना केले आहे. कोरोना या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना बाबत संभ्रमीत करणारे संदेश सोशल मीडियाद्वारे पसरवणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचेही सातपुते यांनी स्पष्ट केले आहे. १ एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगळ्या प्रकारचे मॅसेज एप्रिल फूल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात. जमाबंदी उठले आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा एप्रिल फूल साठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजला कोणीही बळी पडू नये. अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकाकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्यावर त्याचबरोबर ग्रुप ॲडमिनवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ग्रुप ॲडमिन ने आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंग मध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे.असे आवाहन   
 उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments