बारड येथे लॉकडाऊनमध्ये सर्व रस्ते सुनसान
बारड: (पिराजी गाडेकर) मुदखेड तालुक्यातील बारड हे गाव लॉकडाऊन काळामध्ये पूर्णपणे पालन करताना दिसत आहे. कारण कोरोना हा वायरस भारतामध्ये दाखल झाला याची अनेकांना लागण झाली असून हा अकडा दिवसें दिवस वाढत चाललेला आहे हे चिंताजनक आहे.यासाठी खबरदारी म्हणून बारड नगरीच्या वतीने संपूर्ण गावांमध्ये फवारणीद्वारे निर्जतुकीकरण चालू आहे. आणि गावातील संपूर्ण भागात ध्वनिप्रक्षेपण द्वारे दिवसातून चार ते पाच वेळेस कोरोना वायरस आजाराविषयी सतर्क राहण्याचे आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी सर्वांनी घरामध्येच बसून राहायचे आदेश दिले असल्यामुळे येथील ग्रामस्थ योग्य पद्धतीने त्याचे पालन करत आहेत.
काही समाजविघातक व्यक्ती विनाकारण मास्क न वापरता फिरताना दिसले किंवा सात-आठ जण एका जागी दिसले असता पोलीस प्रशासन त्यांचे स्वागत म्हणून त्यांच्या डोक्याला गंधाचा टिळा लावून व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना ओवाळून स्वागत केला जात आहे यावेळी ते नागरिक खाली शरमेने मान घालत आहेत शेवटी न ऐकल्यास बळाचा वापर करून त्यांना योग्य ते दिशा देत आहेत. बारडमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत मंदिरे आहेत एवढेच नव्हे जागृत देवस्थान म्हणून बारडची शितलादेवी पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध आहे येथे काही दिवसा वरच देवीची यात्रा आलेली असून दरवर्षी भाविक लाखोने येतात परंतु आज येथे कोरोना वायरसमुळे सर्वच मंदिराला लॉकडाऊन केल्यामुळे एकही भाविक कुठे फिरकत असलेला दिसत नाही. सर्व मंदिरा च्या अवतीभवती असलेली विविध प्रकारची दुकाने हे देखील पूर्णपणे बंद केले आहे.
तसेच इतर मंदिराला देखील कुलूप लावण्यात आलेले आहे. जीवनावश्यक वस्तू साठी किराणा दुकाने फळ,भाजीपाला, इत्यादीसाठी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत व सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येत आहेत यामध्ये महत्त्वाचे म्हणजे लोकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडत आहेत रांगेतच एक ते दीड मीटर अंतरावर उभे राहून जीवनावश्यक वस्तू खरेदी करत आहेत. अतिमहत्त्वाच काम असल्यास बाहेर पडात आहेत.लागल्यास आम्ही घरपोच सेवा देऊ असे ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात येत आहे.यामध्ये स्वस्त धान्य दुकानावर एक दोन मीटर अंतरावर डबे आखले असून त्या डब्यातच राहून आपला नंबर आल्यास माल घेण्याची सुविधा प्रल्हाद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. यासाठी गावचे सरपंच प्रतिनिधी विलासराव देशमुख व ग्रामसेवक अनुप श्रीवास्तव हे सतत गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन ग्रामपंचायत सेवकांच्या संपर्कामध्ये असून आपलं अनेक हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.
आपल बारडगाव हे कोरोना मुक्त राहिल पाहिजे यासाठी गावचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख हे सतत आपल्या गावाचा विचार करत धडपडत आहेत आणि सर्व ग्रामस्थांना , युवकांना कोरोना या आजाराचे सर्वांनी गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे बाहेरगावावरून कोणी आले असल्यास ताबडतोब ग्रामपंचायतीला कळवावे असे आवाहन करत आहेत. खबरदारी म्हणून कोरोणा या वायरसच्या रुग्णांसाठी येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये विशेष दहा बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यावेळी अंगणवाडी सेविका कर्मचारी हे गावांमध्ये घरोघरी फिरून कुणी बाहेरगावाहून गावांमध्ये आला असल्यास त्याची नोंद घेऊन त्याला शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी पाठवून देत आहेत आणि घरोघरी जाऊन कोणी आजारी असल्याची खातर केल्या जात आहे. जर का कुणी आजारी असल्यास त्याला बारडच्या शासकीय रुग्णालयांमध्ये जाण्याचे मार्गदर्शन करून उपचार घेण्याचे सांगत आहेत. बारड पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन देखील योग्य पद्धतीने काम करत आहे. सर्व जनतेस तुम्ही घरात रहा गावाला सुखरूप ठेवा गावाला निरोगी ठेवा देशाला पण निरोगी ठेवा असे आवाहन करत आहेत आणि लोकांना सतत कोरोना वायरस या आजाराचे गांभीर्य लक्षात घ्या असं ठणकावून सांगत आहेत पोलीस प्रशासन योग्य काम करत आहे यासाठी जनतेने कोणती अफवा पसरू नये व पसरवू देऊ नका महत्वाचे काम असल्यास घराच्या बाहेर निघावे जसे की दवाखाना औषध अति महत्वाचे काम असल्यास स्वतःह बाहेर निघावे काही अडचणी असल्यास लगेच आम्हाला फोन द्वारे कळविण्यात यावे.मात्र कोरोना वायरस अशा महाबिमारी पासून सर्वांचे रक्षण झाले पाहिजे असे उद्देश घेऊन सर्वच बारड नगरीचे ग्रामस्थ समाजसेवक हे गाव आणि देश हितासाठी काम करत असताना दिसून येत आहेत अशाच प्रकारे ग्रामस्थांनी एक होऊन काम केल्यास आपण नक्कीच आपलं गाव हा कोरोना मुक्त करू शकतो व आपल्या देशाला या घातक विषाणूपासून देखील मुक्त करू शकतो परंतु आपणास सध्याला घरातच राहून कोरोना विषाणूला आपण हद्दपार करू शकतो कारण की ही लढाई आपल्याला आतंकवाद यापेक्षाही महाभयंकर आहे याची सर्व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात काळजी घेताना दिसून येत आहे.
0 Comments