Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना व्हायरस बाबत उपाययोजना व आढावा बैठक 

कोरोना व्हायरस बाबत उपाययोजना व आढावा बैठक 



निटूर:(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस बाबत उपाययोजना व आढावा संदर्भात आज सरपंच परमेश्वर हासबे,निटूर यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली या बैठकिला उपसरपंच संगमेश्वर करंजे, तलाठी कुलकर्णी आर.बी,ग्रामसेवक मिरकलकर एस.सी,आरोग्य सेवक धनेधर, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, चौगुले सर्व आशाताई,सर्व अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. 'सोशल डिस्टन्स' ची काळजी घेऊन च ही बैठक झाली यामध्ये खालील विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले १) व्यापारी यांना वेळापत्रक सकाळी ८ ते १२ असावे.शक्यतो घरपोच सेवा द्यावी गावातील सर्व गल्ली बोळातील किराणा दुकानदार यांनीही याचे पालन करावे  २) भाजीपाला चौकात बसून न विकता घरोघरी फिरून विकणे ३)सूचना देऊनही बाहेरून आलेले नागरिक घरी बसत नसतील तर अशांवर पोलीस कार्यवाही करावी ४)गावातील अवैध धंदे बंद करावेत या बाबत पोलीसानी कार्यवाही करावी (दारू,गुटखा) ५) लोडशेडिंग तात्काळ बंद करावी विद्युत वितरण कंपनीने यात तात्काळ कार्यवाही करावी ६)सार्वजनिक पाणी पुरवठा ठिकाणी सोशल डिस्टनस ठेवन्याची व्यवस्था करावी ७) ग्रामपंचायत कडून फवारणी व मास्क देण्याबाबत कार्यवाही करावी ८ )मागील २ दिवस व येथून पुढे बाहेर देश,मुंबई ,पुणे व इतर ठिकानाहून आलेल्या व्यक्तीची तात्काळ माहिती ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना द्यावी  व तपासणी साठी त्यांना दवाखाण्यात जाण्यास सांगावे ९)कोणताही व्यापारी चढ्याभावाने विक्री करत असल्यास लेखी तक्रार पावतीसह केल्यास कार्यवाही करण्यात येईल १० ) नागरिक यांनी घराबाहेर विनाकारण पडू नये लॉकडाऊन चे पालन करावे अन्यथा पोलीस कार्यवाही करण्यात येईल ११)गावाच्या व  आपल्या हितासाठी सर्वांने प्रशासनास सहकार्य करावे १२) आजारी असलेल्या नागरिकांनी दवाखण्यात  जावे व इतर व्यक्तीपासून दूर रहावे 
वरील सर्व नियमाचे पालन करावे असे अहवाहन सर्व नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालय मार्फत करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments