Latest News

6/recent/ticker-posts

कोरोनाबाबत उपाययोजनांसाठी आ.संभाजी पाटील यांचा एक कोटीचा निधी

कोरोनाबाबत उपाययोजनांसाठी आ.संभाजी पाटील यांचा एक कोटीचा निधी 


निलंगा:(प्रतिनिधी) देशासह राज्यातही थैमान घालणाऱ्या कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे .
सध्या राज्यात कोरोना या आजाराच्या विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे . लातूर जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य विभाग विविध उपाय करत आहे .या प्रक्रियेत आपलेही योगदान असावे या उद्देशाने माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात आ.निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे .या निधीतून उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी ,असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.या निधीतून कुठे व कसा खर्च केला जाईल याची सविस्तर रूपरेषा आपणास सादर करावी,असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्न करत आहे. लोकप्रतिनिधीही त्यात अग्रेसर आहेत.आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे .जिल्हा पातळीवर कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी दिला गेलेला हा सर्वात मोठा निधी ठरणार आहे.
नागरिकांचे आरोग्य ही सध्या प्राथमिकता आहेज्या देशात चांगल्या आरोग्य सुविधा आहेत तेथे प्रादुर्भाव रोकता आला आहे .त्यामुळे आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेसाठी हा निधी असून गरज भासल्यास आणखी निधी देवू असेही आ . निलंगेकर यांनी म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments