Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यातील  ३२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन ०९ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित

 


लातूर जिल्ह्यातील  ३२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन ०९ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित


लातुर: (प्रतिनिधी) येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत  दिनांक  २५. ०३. २०२० रोजी सकाळी ८.०० वाजेपासून दु. ४.०० पर्यंत एकुण १७० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकूण  ४२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन ०९ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यापैकी सहा व्यक्तीस अहवाल प्राप्त होईपर्यंत या संस्थेच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे व ३ व्यक्तींना अहवाल प्राप्त होईपर्यंत खाजगी रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. एकुण ३३ जणांना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined  करण्यात आले आहे.पुणे, मुंबई व ईतर शहरातुन प्रवास करुन येणा-या व्यक्तींना तपासणीसाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय या सर्व ठिकाणी तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व प्रवाशांनी व ज्या व्यक्तींना त्रास होत असेल (खोकला, श्वास घेण्यास त्रास) अशा व्यक्तींनी या संस्थेत यावे. ज्यांना त्रास होत नसेल फक्त प्राथमिक तपासणी / चाचणी करावयाची आहे त्यांनी आपल्या जवळील रुग्णालयात तपासुन घ्यावे असे  आवाहन डॉ. गिरीष ठाकुर  अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments