Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना व्हायरस: देशभरात लॉकडाऊनची घोषणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना व्हायरस: देशभरात लॉकडाऊनची घोषणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी


दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्री १२ वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. २१ दिवसांकरता हा लॉकडाऊन असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.कोरोना व्हायरसबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले. तसंच, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
जनता कर्फ्यूमध्ये प्रत्येक भारतीयांनी सहभाग नोंदवला. जनता कर्फ्यूला प्रत्येक भारतीयानं यशस्वी केलं. एका दिवसाच्या जनता कर्फ्यूतून भारतानं दाखवून दिलं की, देशावर संकट येतं, मानवतेवर संकट येतं, त्यावेळी आम्ही सर्व भारतीय कसे मिळून सामना करतो.जगातल्या मोठ्या मोठ्या देशांना कोरोना व्हायरसनं हतबल केलंय.
कोरोना व्हायरस इतक्या वेगानं पसरतोय की, सर्व तयारी केल्यानंतरही आव्हानं वाढत जातायत.कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. म्हणजे, एकामेकांपासून दूर राहणं, आपल्या घरातच राहणं. 
कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा यापेक्षा दुसरा मार्गच नाहीय. संक्रमणाच्या साखळीला तोडावंच लागेल.सोशल डिस्टन्सिंग प्रत्येक नागरिकासाठी आहे. केवळ रुग्णांसाठीच नाही. अगदी पंतप्रधानांसाठीही आहे.
सोशल डिस्टन्सिंगबाबत हलगर्जीपणा सुरूच राहिला, तर भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल. त्या किंमतीचा अंदाजही वर्तवता येणार नाही, इतकी मोठी किंमत असेल.
आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं जाईल. प्रत्येक भारतीयाला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय.केंद्राने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सर्व राज्य सरकार यांनी आरोग्यविषयक बाबींनाच प्राधान्य द्यावे.अफवा पासून नागरिकांनी सावधान रहावे. असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. आपली काळजी घ्या,कुटुंबाची ही काळजी घ्या.असेही त्यांनी शेवटी सांगितले.


Post a Comment

0 Comments